in

सत्ताधारी आणि आयुक्तांनी जनतेची माफी मागावी; पालिकेसमोर मनसेचे आंदोलन

निकेश शार्दुल
गेली 25 वर्षे सत्तेत असूनही सत्ताधारी शिवसेनेने ठाण्यातील नागरिकांसाठी कोणतेही काम केले नसून, ठाणेकरांच्या डोळ्यात केवळ धूळफेक करण्याचे काम केल्याची टीका करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाणे महापालिके समोर आंदोलन करण्यात आले. रस्ते,पाणी, घर यासारखी अनेक आमिषे सत्ताधारी शिवसेनेने ठाणेकरांना दाखवली होती, परंतु त्यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नसल्याची टीका मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली.

गेल्या पंचवीस वर्षात ठाण्याला स्वतःच धरण नसल्याने ठाणेकरांची मोठी गैरसोय होत आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रस्त्यांची दुरावस्था बघून पालकमंत्री यांनी आयुक्तांना सोबत दौरा केला होता व रस्ते बांधकाम कामात दोषी आढळलेल्या चार अभियंत्यांना निलंबित करण्यात आले होते. परंतु केवळ 20 ते 22 दिवसात त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यात आल्याने यावेळी मनसे कडून संताप व्यक्त करण्यात आला.

तर क्लस्टर योजनेचे दोन वेळा उद्घाटन होऊनही अद्याप एकही घर खाली केले नसल्याने या संपूर्ण योजनेबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाचशे स्क्वेअर फुटच्या वरील सदनिकांचा कर माफ करण्याची घोषणा केली होती परंतु त्याचा लाभ ठाण्यातील एकाही घराला मिळाला नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्षा विरोधात जनजागृती करून येत्या 10 डिसेंबर रोजी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्याची घोषणा अविनाश जाधव यांनी यावेळी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आम्हाला धमकीचे, जीवे मारण्याचे निनावी कॉल येतात – यास्मिन वानखेडे

‘लक्ष्मीकांत बेर्डे’ ! नेहमीच लक्षात राहणार ‘लक्ष्या’