in

गडचिरोली | महाराष्ट्र पोलिसांना नक्षलविरोधी मोहिमेत यश

गडचिरोली कुरखेडा पोलिस उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलवादी विरोधी अभियानाला यश मिळाले . आज सोमवार, २९ रोजी सकाळी ७.३० ते ८ या वेळेत झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार झाले. यात 3 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे.

खोंब्रामेंढा- हेटाळकसाच्या जंगलात नक्षलवाद्यांचे शिबीर सुरू असून ६० ते ७०च्या संख्येत मोठ्या प्रमाणात नक्षली सहभागी झाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून जंगल परिसरात सी-६० पथकाने शनिवारी सकाळी सात वाजता नक्षल विरोधी अभियानाला सुरुवात केली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला.

प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी सुमारे ६० ते ७० मिनिटे चाललेल्या या चकमकीनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून गेले. त्यानंतर त्यांच्या मागावर असणारे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात तीन वेळा मोठी चकमक झाली. यामध्ये सोमवारी पाच नक्षलवादी ठार झालेत. त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.

दरम्यान, नक्षवाद्यांच्या पहिल्या ठिकाणावरुन ३०३ रायफल, काडतूस, नक्षल पिट्टू, ३ प्रेशर कुकर बॉम्ब, नक्षल डांगरी ड्रेस, दोन सोलर प्लेट, वायर बंडल, सुतळी बॉम्ब तसेच मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा व नक्षलवाद्यांचे दैनंदिन वापराचे साहित्य मिळून आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CoronaVirus | कोरोनाचा कहर; दुसरी लाट अधिक आक्रमक

Jammu and Kashmir | सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 15 दिवसांत तिरंगा फडकणार