in

महाराष्ट्रातील धावपटूचा हरियाणात मृत्यू

क्रीडा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील धावपटू बंडू वाघमोडे (Runner Bandu Waghmode) याचा हरियाणात (Haryana)मृत्यू झाला आहे. स्पर्धा सुरू असताना बंडू वाघमोडे हा मैदानात कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या वृत्ताने संपूर्ण सोलापूर (Solapur) जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. धावपटू बंडू वाघमोडे हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील निवासी होता.

हरियाणातील रोहतक येथे आंतरराज्य मैदानी स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बंडू वाघमोडे हा हरियाणात गेला होता. वयाच्या अवघ्या 21 वर्षात काळाने त्याचावर आघात केला आहे. बंडू वाघमोडे हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील रहिवासी होता. हरियाणातील रोहतक येथे आंतरराज्य मैदानी स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बंडू वाघमोडे हा हरियाणात गेला होता. बंडू वाघमोडे हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता त्याला सैन्य दल किंवा पोलीस दलात जाण्याची इच्छा होती. मात्र त्याआधीच त्याने जगाचा निरोप घेतला.

बंडू हा स्पर्धेत धावत असताना अचानक मैदानात कोसळला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. बंडूचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. बंडूचे वडील मेंढपाळ करतात सोबतच बंडू सुद्धा वडीलांना हातभार लावत होता. मात्र त्याच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल; निवडणुकीसाठी मनसेकडून मोर्चेबांधणी

मांजरा धरण ‘ओव्हर फ्लो’, पाण्याचा विसर्ग सुरू