in

St Worker Strike | आझाद मैदानातील आंदोलन तात्पुरते मागे, खोत-पडळकरांची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून राज्य सरकारने त्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच काल (बुधवारी) एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत झालेल्या कालच्या बैठकीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. सरकारने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करणार आणि आज (गुरुवारी) यावर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे. .यावर आज आझाद मैदानातील आंदोलन तात्पुरते मागे घेतोय अशी घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पेट्रोल-डिझेलच्या किंमती घटणार? सध्याचे दर काय?

सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसबद्दल काही खास गोष्टी…