in

‘झिम्मा’वर थिरकणार अवघा महाराष्ट्र

‘झिम्मा’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढताना दीसत आहे. ‘झिम्मा’ चित्रपटगृहात कधी येतोय याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाचे शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हे गाणे प्रेक्षकांच्या आवडत आहे.“खेळू झिम्मा गं.…” हे या गाण्याचे बोल असून या गाण्याचे शब्द आणि चाल संगीतप्रेमींना नाचण्यास उत्स्फुर्त करणारी आहे. ट्रेलरमध्येच या गाण्याची झलक आपण पाहिली आणि ऐकली असून हे उत्स्फुर्तदायी गाणे वेगवेगळ्या वयोगटातील मैत्रिणींच्या प्रवासातील मजामस्तिवर चित्रीतकेल्यामुळे हे गाणे ऐकताना आपल्याला आपल्या मैत्रीची आठवण आल्यावाचून राहणार नाही.

अमितराज यांनी या धमाल गाण्याला संगीत दिले असून वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, आरती केळकर, सुहास जोशी यांनी हे गाणे गायले आहे. चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ चित्रपट १९ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ हा लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट आहे. वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत मनमुराद जगण्यासाठी इंग्लंड ला जातात आणि मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेसृष्टीतील सात वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळणे, ही प्रेक्षकांसाठी खरंच पर्वणी ठरणार आहे. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राहुल गांधी ‘ड्रग अ‍ॅडिक्ट’ आणि ‘ड्रग पेडलर’; कर्नाटकातील भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

जरंडेश्वर कारखान्यातील घोटाळ्याबाबत किरीट सोमय्या ईडी कार्यलयात दाखल