in

महात्मा गांधी-सावरकर प्रकरणात राजनाथ सिंह यांचं मोठं विधान; म्हणाले…

New Delhi: Defence Minister Rajnath Singh and RSS chief Mohan Bhagwat (R) release a book 'Veer Savarkar' during a function in New Delhi, Oct. 12, 2021. (PTI Photo/Vijay Verma)(PTI10_12_2021_000166B)

वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटिशांकडे दया याचिका दाखल केली होती. पण स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’, या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राजनाथ सिंह बोलत होते. रूपा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये सावरकरांवरील पुस्तकाचे प्रकाशन करताना सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही मेळाव्याला संबोधित केले.

सावरकर कठोरपणे बोलले म्हणून लोकांचा गैरसमज झाला. पण जर संपूर्ण भारत त्यांच्यासारखे बोलला असता तर देशाला फाळणीला सामोरे जावे लागले नसते असा युक्तिवाद मोहन भागवत यांनी यावेळी केला. मोगल सम्राट औरंगजेबासारख्या व्यक्तींच्या नावावर रस्त्यांची नावे ठेवू नयेत या मताशीही ते सहमत होते असेही भागवत म्हणाले.

गांधींनी सावरकरांना दया याचिका करण्यास सांगितलं –

सावरकरांच्या विरोधात खूप खोटे बोलले गेले आहे. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे वारंवार सांगितले गेले. त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नाहीत. सामान्यत: कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दया याचिका दाखल करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली. आणि महात्मा गांधींनी सावरकरांना सोडण्याचे आवाहन केले होते. गांधीजी ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील असे म्हणाले होते, असे राजनाथ सिंह म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ शहरात खळबळ

कुर्ला येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २० दुचाकी जळून खाक