in

राज्यात महाविकास आघाडी सरकार काँग्रेसमुळे; नाना पटोलेंचे खळबळजनक वक्तव्य

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सध्या विविध वादग्रस्त प्रकरणामुळे अडचणीत सापडली आहे. त्यात आता महाविकास आघाडी सरकारमध्येच वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे. आम्ही सरकारमुळे नाही तर सरकार काँग्रेसमुळे असल्याचे मोठे विधान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. भंडारा येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून नेहमी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका करण्यात येते. त्यामुळे सोनिया गांधी यांच्यावर टीका करणे बरोबर नसून राऊतांनी टीका करणं थांबवावं असा सल्ला नाना पटोले यांनी दिला.तसेच सरकार आम्ही नाही तर महाविकास आघाडी सरकार आमच्यामुळे असल्याचे वक्तव्य पटोले यांनी केले.

शरद पवारांचे प्रवक्ते आहात का ?

नुकत्याच झालेल्या शरद पवार- अमित शहा यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा.अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही असे ट्विट केले होते.यावर नाना पटोले यांनी संजय राऊत यांना शरद पवारांचे प्रवक्ते आहात का ? असा सवाल केला. शिवसनेना यूपीएची सदस्य नसल्याचीही टोलेबाजी करून आठवण करून दिली. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सारखी भूमिका मांडल्याचा टोला पटोलेंनी लगावला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ramnath Kovind Health | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावरील बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

Indian Railway|रेल्वेने प्रवास करताय ? नव्या गाईडलाईन्स नक्की वाचा