in

बाबरी मशिदीबद्दलच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी

बाबरी मशीद विद्ध्वंसाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (3 मार्च) रोजी विधानसभेत केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले. बाबरी मशीद पाडली तेव्हा, ‘येरे गबाळे’ पळून गेले. बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितले होते की, बाबरी मशीद पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर, मला त्यांचा अभिमान आहे, गर्व आहे. हे आहे हिंदुत्व. त्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, तेवढी तुमची पात्रता नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले होते.

यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बाबरी मशीद पाडल्याचा आनंद साजरा केला. तिथे उपस्थित असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री तसेच आमदार या भाषणाचा आनंद घेत होते. हा कोणत्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे? असदुद्दीन ओवैसी यांच्या विषवृक्षाला खतपाणी मिळेल, असे हे भाषण ठरणार नाही ना? असे सवालही निरुपम यांनी केले आहेत.

अबू आझमींची टीका

भाजपला थांबवण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली होती. किमान समान कार्यक्रमाच्या आधारे राज्यात आघाडी सरकार स्थापन झाले होते. अशा वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन करणे ही गंभीर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार करणार असल्याचे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे हे विसरले आहेत की, ते मुख्यमंत्री आहेत. बाबरी मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य आहे. तुम्ही आमच्या जखमेवरची खपली काढू नका. हे मंदिर किंवा मशिदीचे नव्हे तर, सेक्युलर सरकार आहे, असे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी म्हणाले. तसेच या मुद्द्यावर आघाडीच्या सर्व मुस्लीम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत 1 हजार 103 नवे कोरोनाबाधित; दुप्पटीचा दर 238 दिवसांवर

पाकिस्तानमधील सिनेट निवडणुकीत इम्रान खान यांना झटका, मंत्री अब्दुल हफीज शेख पराभूत