in

Maharashtra Band; महाविकास आघाडीच्या बंदला औरंगाबादमध्ये अल्प प्रतिसाद

औरंगाबाद : सचिन बडे | लखीमपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला औरंगाबादेत अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ सह बहुतांश ठिकाणी दुकाना सुरू असल्याचे दिसून येत आहे.

औरंगपुरा, शहागंज, टाऊन हॉल, टिव्ही सेंटर आदी ठिकाणी दुकाने नियमित सुरू आहे. तसेच औरंगाबाद व्यापारी संघटनेने देखील या बंदला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाना सुरू ठेऊन बंदला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या लोकप्रतिनिधीनी सकाळीच शहरात रॅली काढून दुकाना बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाना उघडून बंदला विरोध दर्शवला. त्यामुळे औरंगाबाद शहरात बंदला अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देवेंद्र फडणवीसांचा ढोंगीपणा जनतेसमोर – नाना पटोले

नवरात्रीनिमित्त साकारली 340 चौरस फुट रांगोळी