in

रस्त्याच्या कामात गैरप्रकार; ईडीच्या पथकांची चौकशी सुरू

वाशिम | यवतमाळमध्ये रस्त्याच्या कामासाठी ईडीची चौकशी झाली शिवसेनेची खासदार भावना गवळी यांच्यावर त्यांचे निकटवर्तीय असलेले सय्यद खान यांना चौकशीसाठी ताब्यात घेवून चौकशी केली. वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात गैरप्रकार झाल्याची माहिती उघडकीस आल्यावर आज ईडीचे 4 अधिकारी वाशिम शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात दाखल झाले तर 4 अधिकारी देगांवच्या बीएएमएस कॉलेजमध्ये या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

वाशिम शहरातील रस्त्याच्या कामासाठी एकूण 5 टेंडर आले होते, यातील 2 टेंडर बेकायदेशीर रित्या अपात्र करण्यात आले. उर्वरित 3 टेंडर अजयदीप इन्फ्राकाँन प्रा. लि. औरंगाबाद या कंपनीचे होते. या कंपनीने 13 टक्के जास्त दराने टेंडर घेतले.
या संदर्भात वाशिम येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक हरीश सारडा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. महत्वाचीबाब म्हणजे या संदर्भात ईडीसमोर सुरू असलेल्या चौकशीत अजयदीप इन्फ्राकाँन प्रा. लि. औरंगाबाद यांनी सदर टेंडर खासदार भावना गवळी यांनी मॅनेज करून आपल्याला दिल्याचे सांगितले. तसेच हे काम अजयदीप इन्फ्राकाँन प्रा. लि.औरंगाबाद या कंपनी कडून सय्यदखान यांच्या भूमी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आल्याचे त्यांच्या कडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान चौकशीसाठी आज वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि देगांव येथील बीएएमएस कॉलेजमध्ये सय्यद खान यांच्यावर ईडीच्या पथका कडून चौकशी सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…नाही तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही; पंकजा मुंडेंचा विरोधकांना इशारा

वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू; उर्जामंत्र्यांची माहिती