in

यापुढे लसीच्या प्रमाणपत्रावर मोदींऐवजी ममतांचा फोटो?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद शमण्याचे चिन्ह नाहीय. लसीकरण झाल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात येतो. यावरून आधीही टीका करण्यात आली होती.

मात्र यापुढे पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बंगालमध्ये लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या लसींच्या प्रमाणपत्रावर हा फोटो असेल, अशी प्राथमिक माहिती आहे.

ममता बॅनर्जी याआधीपासूनच केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर सवाल उपस्थित करत आल्या आहेत. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा मुद्दा त्यांनी वारंवार उपस्थित केला आहे. यातच ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व मुख्य मंदिरातील पुजाऱ्यांना कोरोना विरोधी लस देण्याचे आदेश दिले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार आता तिसऱ्या टप्प्यात कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रकावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो छापण्यात येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईसाठी आशेचा किरण; स्पुटनिक साठा जून अखेर मिळणार

”मागच्या सरकारमध्येही सुपरमंत्री होते”, नाना पटोलेंचे फडणविसांना प्रत्युत्तर