in , , ,

मांजरा धरण ‘ओव्हर फ्लो’, पाण्याचा विसर्ग सुरू

बीडसह उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा प्रमुख जलस्त्रोत असणारा मांजरा प्रकल्प तुडुंब भरला आहे. त्यामुळे उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या पावसाने धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे हे धरण आहे. पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मांजराच्या उजव्या कालव्यातून १.२७ प्रति सेकंद घनमीटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.

मांजरा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने केज विधानसभा मतदारसंघात आनंद व्यक्त केला जात आहे. मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी असून धरणात २२५.५ दलघमी पाणीसाठा झाल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आलेत. प्रती सेकंद १४९.८० घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. सहा वर्षांच्या दुष्काळानंतर २०१६ साली झालेल्या मुसळधार पावसाने धरणाचे दरवाजे उघडण्याचा योग आला होता. नियमितपणे हे धरण प्रतिवर्षी पूर्ण क्षमतेने भरत आहे. यंदाही निसर्गाने भरभरून दिल्याने सलग तिसऱ्या वर्षी हे धरण तुडुंब भरले आहे.

गेल्या आठ-दहा दिवसांत पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही तर नदी नाल्यातून पाणी मात्र धरणात आले. याचा परिणाम हे धरण आता शंभर टक्के भरले आहे. या धरणाचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता १७६.९६३ दशलक्ष घनमीटर आहे. २० सप्टेंबरला हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सलग तिसऱ्या वर्षी हे धरण तुडुंब भरले असून दरवाजे उघडण्याचा सुखाचा प्रसंग अनुभवयास मिळाला असून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रातील धावपटूचा हरियाणात मृत्यू

राज्यात सलग 3 दिवस जोरदार पाऊस