in

Mann Ki Baat : पाणी वाचवण्याची ही योग्य वेळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात जलसंवर्धनाचा मौल्यवान संदेश दिला आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत. त्यामुळे पाण्याची बचत करून पाणी वाचवण्याची ही योग्य वेळ आहे. “पाणी हे आपल्यासाठी जीवन आहे, इतकेच नाही तर परिसापेक्षा पाणी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. आपण आत्ताच पाण्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत, २२ मार्च रोजी जागतिक जलदिनआहे. या पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्यासाठी अभियान देखील सुरू केले आहे.

आपल्या परिसरातल्या जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यासाठी आणि येणा-या पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी, जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनही जल शक्ती अभियान म्हणजेच ‘कॅच द रेन’ ही सुरू करण्यात येणार आहे.

“माघे निमग्ना: सलिले सुशीते, विमुक्तपापा: त्रिदिवम् प्रयान्ति, म्हणजेच माघ महिन्यात कोणत्याही पवित्र जलाशयात स्नान करणे पवित्र मानले जाते. जगातील प्रत्येक समाजात नदीशी संबंधित परंपरा आहे. आपली संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे, म्हणूनच त्याचा विस्तार आपल्याकडे पाहिला मिळतो.” असे देखील ते यावेळी म्हणाले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इस्रोची यंदाची पहिली अंतराळ मोहीम यशस्वी

राज्यात सध्या मोगलाई सुरू ; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल