in

मनसुख हिरेन प्रकरण; पत्नी विमल यांचा ‘तावडे’ नावाच्या व्यक्तीचा उल्लेख…

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकं सापडलेल्या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मुंब्र्यात मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणात पोलीस हिरेन यांनी आत्महत्या केल्याचे सांगत असताना कुटुंबियांनी हे आरोप फेटाळून लावला आहे. या प्रकरणात आता पत्नी विमल हिरेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांनी कळवा खाडीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली होती. दरम्यान पत्नी विमल हिरेन यांनी मनसुख हिरेन हे आत्महत्या करणं शक्य नसल्याचं सांगत पोलिसांनी चुकीची माहिती देऊ नये अशी विनंती केली आहे. यावेळी त्यांनी कांदिवली क्राइम ब्रांचमधील तावडे नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे.

“मी आणि माझं कुटुंब असा विचारही करु शकत नव्हतं. आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरी गेली होती. पोलीस जेव्हा कधी फोन करायचे माझे पती चौकशीसाठी जात होते. पोलीस तासनतास त्यांना बसवून ठेवायचे. कालही त्यांना बोलावलं होतं, ते गेले होते पण परत आले नाही. १० वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. कांदिवली क्राइम ब्रांचमधून तावडे म्हणून कोणाचा तरी फोन आला होता. ते गेल्यानंतर अर्ध्या तासात फोन बंद झाला. आम्ही रात्रभर वाट पाहिली. सकाळीपण काही पत्ता नसल्याने तक्रार दिली,” असं विमल हिरेन यांनी सांगितलं आहे.

तपास एटीएसकडे वर्ग

“मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्या प्रकरणात गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल. आम्ही हा तपास एटीएसकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरणात चर्चेत असलेले सचिन वाझे नेमके आहेत कोण?

नागपूर जिल्ह्यात १४ मार्चपर्यंत निर्बंध कायम