in

‘तपास यंत्रणांकडून मानसिक छळ होतोय’; मनसुख हिरेन यांनी केली होती तक्रार

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणात आणखी एक खुलासा समोर आला आहे. तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ केला जात होता, अशी तक्रार मृत्यूपूर्वी दस्तरखुद्द हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली होती.

अंबानी यांच्या घराबाहेरील कार हिरेन यांची असल्याचं स्पष्ट झालं आहे. कार चोरीला गेल्याची तक्रारही त्यांनी दाखल केली होती. मात्र, त्यानंतर स्फोटके आढळलेल्या कारप्रकरणी मनसुख यांचीही तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत होती. दरम्यान, तपास यंत्रणांकडून एकसारखे प्रश्न विचारले जात असल्यामुळे मानसिक छळ होत असल्याची तक्रार हिरेन यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली होती, अशी माहिती आता समोर आली आहे.

गुरुवारी रात्री बेपत्ता झाल्यानंतर शुक्रवारी खाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मनसुख यांच्या तक्रारीमुळे आता पोलीस आणि तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तुमच्या शाैर्याला सॅल्यूट, मुख्यमंत्री ठाकरे यांचा जखमी जवानाला फोन

Mansukh Hiren | मनसुख यांनी मृत्यूपूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोर