in

मिरवणुकीत घुसलेल्या कारनं अनेकांना उडवलं; ४ जणांचा मृत्यू, २० जखमी

छत्तीसगडच्या जशपूरमध्ये रस्त्यावरून जात असलेल्या एका धार्मिक मिरवणुकीत कार अचानक मिरवणुकीत घुसल्यानं ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर वीसहून अधिक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. उपस्थित लोक संतापल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला. उपस्थितांनी लोकांना चिरडणारी कार पेटवून दिली. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकासह दोघांना अटक केली.

बबलू विश्वकर्मा असं मुख्य आरोपीचं नाव आहे. त्याचं वय २१ वर्षे आहे. तो मध्य प्रदेशातल्या सिंगरौलीचा रहिवासी आहे. तर दुसऱ्या आरोपीचं नाव शिलुपाल साहू असं आहे. त्याचं वय २६ वर्षे आहे. तो मध्य प्रदेशातल्या बबरगवा जिल्ह्याचा रहिवासी आहे. दोन्ही आरोपींविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

घटनेमुळे संतापलेल्या लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उदयनराजेंच्या निवासस्थानी “शाही सीमोल्लंघन सोहळा” साजरा

हल्ली काही लोकांना मुख्यमंत्री असल्यासारख वाटतय; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला