गेले अनेक दिवस तापत असणारा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षण प्रश्न तात्काळ सोडवावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक घेतली असून, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून इतर समाजाप्रमाणे मराठा समाजाला सुद्धा न्याय द्यावा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या पाश्वभूमीवर गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार राज्यातील ७० टक्के मराठा समाज मागास आहे. सारथी सारख्या संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने मराठा आरक्षणावर लवकर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. राज्य सरकारकडे इच्छा शक्तीचा अभाव असून या प्रकरणावर लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर केंद्र सरकारला आता संधी असून, केंद्र सरकारने भूमिका घ्यावी असे मत अशोक चव्हाण यांनी मांडले. केंद्र सरकारकडे वेगवेगळ्या 16 राज्याचे आरक्षणाचे प्रश्न आहेत त्यामध्ये मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. या आरक्षणासाठी विरोधी पक्ष नेत्यांनी देखील सहकार्य द्यावे अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली.
नुकतीच खासदार उदयनराजे भोसले ज्येष्ठ राजकीय नेत्यांना व दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांना भेटून मराठा आरक्षणाबाबत सद्य राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे.
Comments
Loading…