in

Maratha Reservation | EWS आरक्षणाचा लाभ मराठा समाजालाही

राज्य सरकारी नोकऱ्यांमधील नियुक्ती आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) असलेल्या १० टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजालाही देण्याचा निर्णय राज्य शासनाने सोमवारी घेतला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे (एसईबीसी) आरक्षण रद्दबातल ठरविल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

संसदेने संविधानात १०३ व्या घटनादुरुस्तीनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने आजचा निर्णय घेतला. मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्ग तयार करून शिक्षण व नोकऱ्यांमध्ये अनुक्रमे १२ व १३ टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र, हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले. आता आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठीचे (ईडब्ल्यूएस) आरक्षण मराठा समाजालाही देण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात यंदा पडणार ‘एवढा’ पाऊस

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची प्रकृती बिघडली