in

Maratha Reservation | बीड येथे निघणार, मराठा क्रांती संघर्ष मोर्चा

मराठा आरक्षण टिकण्यात राज्य सरकारला अपयश आले. त्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे हे बीड येथे मोर्चा काढणार आहेत. त्याच धर्तीवर पुण्यात देखील मध्यवर्ती ठिकाणी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक आंदोलन केले जाणार असल्याचे शिवसंग्रामचे प्रवक्ता तुषार काकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हा मोर्चा मुख मोर्चा नसून बोलका असणार आहे. सरकार विरोधात घोषणा दिल्या जाणार आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठया संख्येने नागरिक सहभागी होणार असले तरी सुरक्षित अंतरासह सर्व नियमांचे पालन केले जाणर आहे. या मोर्चाकरिता विविध संघटनेचे प्रतिनिधी स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. त्याच बरोबर आता तरी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल करावी. अन्यथा आंदोलनाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी. जरी बीडमध्ये आंदोलन होणार असले, तरी आम्ही पुण्यात प्रतिकात्मक आंदोलन करणार आहोत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आनंद महिंद्रांनी केले मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे कौतुक

Maratha Reservation | मराठा तरुणांना EWS मध्ये 10 % आरक्षण मिळणार