साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले मुंबईच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गेले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षण संदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर 11 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवास्थानी जाऊन उदयनराजे यांनी भेट घेतली होती. यावेळी, मराठा आरक्षण संदर्भात सरकार गंभीर नाही. वकिलांनी सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडली नाही. त्यामुळे मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने श्वेत पत्रिका सादर करावी, अशी मागणी उदयनराजेंनी केली.
मागील काही दिवसांपासून उदयनराजे भोसले हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेताना दिसत आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी दिल्लीत शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा भेटीनंतर उदयनराजे यांनी व्यक्त केली होती.
Comments
Loading…