in

Markis Kido passes away | दिग्गज बॅडमिंटनपटू मार्किस किडो यांचे निधन

इंडोनेशियाचा दिग्गज बॅडमिंटनपटू मार्किस किडो याचे आज सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. बॅडमिंटन इंडोनेशियाने आपल्या अधिकृत ट्विटरवरुन ही माहिती दिली. भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय, अजय जयराम आणि ज्वाला गुट्टा यांनी किडोच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

३६ वर्षीय किडो पुरुष दुहेरी प्रकारातील महान खेळाडू मानला जात होता. २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीत त्याने हेंड्रा सेटिआवानसोबत सुवर्णपदक पटाकावले होते.ऑलिम्पिक सुवर्णपदकाव्यतिरिक्त किडोने २००६च्या वर्ल्डकप दुहेरीत, २००७मध्ये विश्व चॅम्पियनशिपच्या दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. एका वृत्तानुसार, बॅडमिंटन सामना खेळताना किडोचा मृत्यू झाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation | संभाजीराजे व उदयनराजेंच्या भेटीवर वडेट्टीवार म्हणाले…

‘काही मिनिटांतच जमिनीचा भाव दोन कोटींवरुन 18.5 कोटी कसा काय होऊ शकतो?’