in

मुंबईतील शाळा सुरु होऊ शकतील, पण…

राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी शाळा सुरु होणार आहेत तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.मात्र, मुंबईतील शाळा सुरू करण्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मुंबईतील शाळा सुरू कधी होणार याचं गूढ वाढलं आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारण्यता आलं असता येत्या दोन दिवसात आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

शासन आदेशानुसार मुंबईतील (Mumbai) शाळा (school) सुरु होऊ शकतील, पण 5 ऑक्टोबरपर्यंतच्या पॉझिटीव्हिटी रेटवर प्रशासनाचे लक्ष आहे. कोरोना पॉझिटीव्हिटी रेट वाढला तर मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत पुर्नविचार होऊ शकतो, असे संकेत पालिका प्रशासनाने दिला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत मोठं विधान केलं. शाळा सुरु करण्यास राज्य शासनानं परवानगी दिल्यानंतर शाळा सुरू करण्यात येईल. कोरोनाच्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे. दोन दिवसात आम्ही याबाबतचा आढावा घेऊन त्याबाबतचा पुढील निर्णय घेऊ. हा आढावा घेताना गणपती नंतर झालेल्या चाचण्यानंतर काय रिझल्ट आला तेही पाहिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

मुंबईत शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. शिक्षकांचं 70 टक्के लसीकरणही झालं आहे. पालिकेच्या 10 हजार शिक्षकांपैकी 7 हजार शिक्षकांच लसीकरण झालं आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

मुंबईत कोरोना रेट कमी झाला आहे. सध्या पॉझिटीव्हिटी रेट 0.06 टक्के आहे. 100 पैकी एक ते दोन जणांचे कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. तसेच, 15% रुग्ण बेडवरच आहेत. तसेच 85% बेड रिक्त आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबरनाथच्या डम्पिंगवर पडला लॉलीपॉपचा खच, अज्ञाताने टाकले लॉलीपॉप

सोने – चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घट, पहा आजचे दर