in

महापौर किशोरी पेडणेकरांचा लोकल प्रवास; प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे केले आवाहन

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. रुग्णाचा हा वाढता आकडा नियंत्रणात आणण्यासाठी आज महापौर किशोरी पेडणेकरांचा लोकल प्रवास करत प्रवाशांना कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

मुंबईची लोकल सेवा सुरु झाल्यानंतर काही अंशी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांनी आज भायखळा ते सीएसएमटी लोकल प्रवास करून प्रवाशांना मास्क घालण्याचे आवाहन केले. तसेच प्रवासादरम्यानही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन हि त्यांनी यावेळी केले.

दरम्यान मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले.

लॉकडाऊन संदर्भात किशोरी पेडणेकर म्हणाल्या,कोरोनाचे नवीन रुग्ण केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यातच वाढली आहे. पण लॉकडाउन लागू होणार नाही, परंतु परिस्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आसाराम बापूची तब्बेत बिघडली

Tech Update : Motorolaने लाँच केले दमदार स्मार्टफोन्स