in

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे सर्वांच लक्ष… मराठा आरक्षणाची दिशा ठरणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज सायंकाळी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षण प्रश्नावर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या मुख्यमंत्र्यांच्या उद्या 8 जून रोजी बैठक होणार असल्याने आजच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि तौते चक्रीवादळ मदतीसंदर्भात चर्चा केली जाईल”.

दरम्यान उद्या पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शरद पवार यांची ७ वाजता भेट घेणार आहेत. या बैठकीत आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेमकी काय चर्चा होते हे आता बैठकीनंतर आपल्याला कळणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या

PM Narendra Modi : ”18 वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण करणार”