in

Maratha Reservation | संभाजीराजे व उदयनराजेंच्या भेटीवर वडेट्टीवार म्हणाले…

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षण प्रश्नावर विविध नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेत आहेत. आज या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांची पुण्यात बैठक पार पडली. त्यावर आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

“दोन्ही राजे मराठा समाजासाठी एकत्र आले याचा आनंद आहे. समाजाच्या हक्कासाठी आंदोलन करणे त्यात काही गैर नाही. मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा सहकार्य करावे ही विनंती.” असं विजय वडेट्टीवार यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Online Education | ”मोदी जी नेटवर्क फक्त डोंगरावर येते”,फोपसंडी गावच्या तुषारचे थेट पंतप्राधानांना पत्र

Markis Kido passes away | दिग्गज बॅडमिंटनपटू मार्किस किडो यांचे निधन