in

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

अप आणि डाउन मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक

मध्य रेल्वे, मुंबई विभाग आपल्या उपनगरीय विभागांत आज विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत हा मेगाब्लॉग असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.36 पर्यंत सुटणारी डाउन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविली जाऊन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे डाउन धिम्या मार्गावर वळविली जाईल.

सीएसएमटी मुंबई / वडाळा ते वाशी / बेलापूर / पनवेल डाऊन हार्बर मार्गावर रविवार १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.३४ ते संध्याकाळी ४.४७ पर्यंत तसेच सीएसएमटी मुंबई ते वांद्रे / गोरेगाव डाऊन हार्बर मार्गावर रविवार १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ९.५६ ते संध्याकाळी ४.४३ पर्यंत मेगाब्लॉक असल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद राहील. तसेच सीएसएमटी मुंबई / वडाळा ते वाशी / बेलापूर / पनवेल अप हार्बर मार्गावर रविवार १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत तसेच सीएसएमटी मुंबई ते वांद्रे / गोरेगाव अप हार्बर मार्गावर रविवार १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ४.५८ पर्यंत रेल्वे वाहतूक बंद असेल. पनवेल ते कुर्ला दरम्यान मेगाब्लॉक काळात विशेष गाड्या धावणार आहेत.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून दोन परप्रांतीयांची हत्या

friendship beyond boundaries..!!, सुजय विखे पाटीलांनी पार्थ पवारांचा फोटो शेअर करत केले ट्विट