in

एमजी मोटरने लॉन्च केली ‘अॅस्टर’; भारताची पहिली पर्सनल एआय असिस्टंट कार

एमजी मोटर इंडियाने एसयूव्ही एमजी अॅस्टर ९.७८ रु. च्या खास प्रारंभिक किंमतीत लॉन्च केली आहे. ही भारताची पहिली पर्सनल एआय असिस्टंट कार आहे. आजपासून एमजीच्या विस्तृत नेटवर्क किंवा वेबसाइट (www.mgmotor.co.in) वर जाऊन अॅस्टरची टेस्ट ड्राइव्ह आणि प्री-रिझर्व करता येणार आहे. कार बुकिंग २१ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होईल आणि डिलिव्हरी नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरू होईल.

“अॅस्टर ही गाडी एमजी ब्रॅंडचा स्थापित वारसा पुढे नेत भविष्यातील मोबिलिटीस सम्मोहक बनवते आणि सोबत त्यात व्यक्तिमत्व, व्यावहारिकता आणि टेक्नॉलॉजी आणते. अनेक फीचर्सनी समृद्ध आणि या सेग्मेंटमध्ये आधी न दिसलेल्या टेक्नॉलॉजीने सुसज्ज ही एसयूव्ही या सेग्मेंटमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करेल, असे एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव चाबा म्हणाले आहेत.

एमजीच्या इमोशनल डायनॅमिझमच्या ग्लोबल डिझाइन फिलॉसॉफीअनुसार अॅस्टरचे स्टायलिंग करण्यात आले आहे. स्मार्ट आणि शार्प व्हेरियन्टसाठी अॅस्टरच्या आय-स्मार्ट टेक्नॉलॉजीमध्ये ८०+ कनेक्टेड कार फीचर्स आहेत. ऑटोनॉमस लेव्हल २ फीचर्सवाल्या एडीएएस २२० टर्बो एटीमध्ये पर्यायी पॅकच्या बरोबर शार्प व्हेरियन्टसाठी व्हीटीआय-टेक सीव्हीटी ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असेल.

या सेग्मेंटमध्ये पहिल्यांदाच अॅस्टरमध्ये ३-६० प्रोग्राम आहे. हा एक अशुअर्ड बाय बॅक प्लान आहे, ज्याच्या अंतर्गत खरेदीनंतर तीन वर्षांनी ग्राहकांना अॅस्टरच्या एक्स-शोरूम किंमतीच्या ६० टक्के मिळू शकतात. हा प्रोग्राम लागू करण्यासाठी एमजी इंडियाने कारदेखोशी भागीदारी केली आहे. अॅस्टर ग्राहक त्याचा स्वतंत्रपणे लाभ घेऊ शकतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अभिनेत्री श्रुती मराठेचा वाढदिवस…फॅन्स ने दिले सरप्राईज

वाहतूक कोंडी सूटणार ? पालघर, मुंबई, ठाण्यासाठी नवीन नियमावली