in

बलात्काराच्या घटनेने पुन्हा मुंबई हादरलं; 7 वर्षांच्या मुलीसोबत दुष्कर्म

साकीनाका बलात्कार मृत्यू प्रकरणातून मुंबईत सावरत असताना आता आणखीन एका बलात्कार प्रकरणाने मुंबई हादरलं आहे. अंधेरीतील एमआयडीसी परिसरात एका 7 वर्षांच्या मुलीसोबत आरोपीने दुष्कर्म केल्याची घटना समोर आली आहे. या सततच्या बलात्काराच्या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबई बलात्काराच्या घटनेने पून्हा हादरले आहे. अंधेरीतील एमआयडीसी परिसरात एका 7 वर्षांच्या मुलीसोबत आरोपीने दुष्कर्म केल्याची घटना घडली आहे. आरोपी नराधम गेल्या 10 दिवसांपासून संबंधित पीडित अल्पवयीन मुलीला पैसे देऊन तिच्यासोबत दुष्कर्म करत होता आरोपी अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरातीलच आहे. या प्रकरणी नराधम आरोपीला अटक करण्यात आली असून पॉस्को अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

करूणा शर्माच्या कोठडीतला मुक्काम वाढला!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करणार