in

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा

अनिल साबळे | मतदार संघातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे अपयशी ठरले असून त्यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांनी केली आहे.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे महसूल खाते असताना ते सिल्लोड मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्री पदाचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा झाला नाही. शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्याची जबाबदारी त्यांची असताना त्यांनी चालढकल करीत आपले अपयश झाकत अधिकाऱ्याकडे बोट दाखवत असल्याचा आरोप माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांनी केला आहे.

त्यामुळे त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सांडू पाटील लोखंडे यांनी लोकशाहीशी बोलताना केली आहे. दरम्यान त्यांनी तहसीलदरांना निवेदन देत तालुक्यात झालेल्या विमा घोटाळ्या ची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“कर भरला नाही म्हणून सरकार व्याज घेतंय” म्हणतं कंगनाचे रडगाणं सुरूच

५० वर्षांवरील झाडं ‘हेरिटेज वृक्ष’, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा