in

मुंबईत अल्पवयीन मुलीचा एकाच रात्रीत तिघांनी केला गँगरेप… इन्स्टाग्रामवर झाली होती ओळख

महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच यामध्ये मुंबईतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला. ‘इन्स्टा’वरील मित्रांनी वाढदिवसांच्या निमित्ताने बोलावून घेतलं आणि सहा जणांनी तिच्या मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. सर्व आरोपी १८ ते २३ वयोगटातील असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेबद्दल पोलिसांनी सविस्तर माहिती दिली. ३१ मे आणि १ जूनच्या रात्रीत ही घटना घडली आहे. १६ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांना मालाड वेस्ट पोलीस ठाण्यात दिली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी अचानक मुलगी स्वतःच घरी परत आली.

त्या रात्री काय घडलं?

मुलगी घरी परतल्यानंतर ती घाबरली होती. यावरून संशय आल्याने आई-वडिलांनी रात्रभर कुठे होतीस, असा प्रश्न केला. मात्र तिने काहीही सांगितलं नाही. यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांचं पथक मुलीच्या घरी गेलं. यावेळी चौकशी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुलीने टाळाटाळ केली. अखेर काही वेळाने पीडितेने तिची आपबीती सांगितली.

‘इन्स्टाग्राम’वरील मित्रांचं वाढदिवसाचं निमंत्रण

इन्स्टाग्रामवर मुलीचे काही जण मित्र झाले होते. त्यातीलच एका मित्राचा वाढदिवस होता. यामुळे त्यांनी पार्टी ठेवली होती. ३१ मे रोजी रात्री सर्वजण मढ येथील एका हॉटेल बाहेर भेटले. त्यांनी गाडीवरच केक कापून सेलिब्रेशन केलं. यावेळी नराधमांनी डाव साधला. दोन मित्र तिला कारमध्ये घेऊन गेले. त्या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिला मालाड भागातील दुसऱ्या मित्राच्या घरीत सोडलं. तिथेही तिच्यावर मित्रांनी बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलगी आपल्या दुसऱ्या मित्राच्या घरी गेली. पण दुर्दैवाने तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“आरक्षणासाठी मराठ्यांची तिसरी लाट येणार”

New indian labor law | देशात नवीन कामगार कायदे येणार.. भत्ते व सवलतींमध्ये मोठे बदल