in

पुणे हादरलं! एकतर्फी प्रेमातून 13 वर्षीय मुलीचा खून

पुण्यातील बिबवेवाडीत इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या एका कबडीपट्टू मुलीचा नात्यातील तरुणाने धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून केल्याची घटना घडली.

जाणून घ्या घटना :

▪️ क्षितिजा अनंत व्यवहारे असं या मुलीचं नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती कबड्डी खेळाडू होती.क्षितिजा तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. यावेळी तिच्या नात्यातला एक तरुण आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले.

▪️ नात्यातल्या या तरुणाने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला.त्यावेळी त्याने तिच्या मैत्रिणींना लांब पळवून लावले. त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला.

▪️ ती खाली पडल्यानंतर त्याने तिच्या गळ्यावर एकामागे एक असे वार करण्यास सुरुवात केली.यावेळी आरोपीने अत्यंत भीषण पद्धतीने आरोपीने तिचा खून केला असून धडापासून मुंडके वेगळे करण्याचा त्याने प्रयत्न केल्याचं पंचनाम्यातून दिसून येत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या मुलीची हत्या होत असताना या ठिकाणी लहान मुले कबड्डीचा सराव करीत होते. तसेच नागरिक चालण्याचा व्यायाम करीत होते. ही घटना एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा तीन नराधमांनी कोयत्याने गळा चिरून केली हत्या

साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनाला जाताना महिला बाईक रायडरचा अपघातात मृत्यू