in ,

Miss Maharashtra | शेतकरी कन्येला मानाचा मुकूट, ‘खाकी’तली सौंदर्यवतीचे पाहा फोटो

महाराष्ट्र पोलीस दलातील शेतकरी कन्या बनली ‘मिस महाराष्ट्र’. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रतिभा सांगळे यांनी बीड पोलीस मुख्यालयात महिला काॅन्स्टेबल पदावर कर्तव्य बजावत असतानाच पटकावला मिस महाराष्ट्रचा किताब.

२०१० साली पोलीस दलात भरती झालेल्या सांगळे यांचा महिला कुस्तीपटू ते पोलीस हेडकाॅन्सटेबल व आता मिस महाराष्ट्र पर्यंतचा हा प्रवास सर्वच स्तरांतील महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

पोलीस दलातील महिला हेडकाॅन्स्टेबल ठरली मिस महाराष्ट्र

बीडच्या प्रतिभा सांगळे यांनी पटकावला मिस महाराष्ट्रचा किताब

किताब पटकावल्यानंतर सांगळे प्रचंड चर्चेत

नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

“बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. येथे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण फारच कमी आहे. मी पालकांना आवाहन करु इच्छिते की मुलीचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्यांचं लग्न करु नका,” असंही त्या म्हणाल्या. तसेच मुलींचा बालविवाह केला जाऊ नये यासाठी आपण जिल्ह्यात जनजागृती करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पोलीस दल, कुस्ती आणि मॉडेलिंग या सगळ्या गोष्टींची सांगड घालत सांगळे यांनी ग्रामीण भागातील महिलांसमोर एक आदर्श घालून दिलाय. या यशानंतर पोलीस दलासह बीड जिल्ह्यात प्रतिभा सांगळे यांचं कौतुक होतंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात

महाराष्ट्र सदन घोटळाप्रकरणात अंजली दमानियांची उच्च न्यायालयात धाव