in ,

“बरोबर ना राऊत साहेब?” नितेश राणेंनी मांडलं राऊत आणि पाटकर समीकरण…

प्रसाद लाड यांच्या सेनाभवनाच्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. त्यात आता आमदार नितेश राणे यांनी उडी घेतली आहे. प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना राऊत यांनी ट्वीट केले होते. त्याला नितेश राणेंनीही प्रत्युत्तर दिलंय. यामध्ये त्यांनी डॉ. स्वप्ना पाटकर यांचा संजय राऊत यांनी छळ केल्याच्या प्रकरणातील संदर्भ दिला आहे.

“नशामुक्त महाराष्ट्र बरोबर “महिलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र” हाही कार्यक्रम तातडीने घेतला पाहिजे. जेणेकरून डॉ. स्वप्ना पाटकर यांच्यासारख्या महिलांना न्याय मिळेल! बरोबर ना राऊत साहेब?”, असं ट्वीट करत राणे यांनी राऊतांना टोला लगावला. डॉ. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात ते आपला छळ करत असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला आहे. त्यावरून राणेंनी राऊतांवर टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?

“महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाड्याना मराठी माणूस सेनाभवनाच्या फुटपाथावर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतिक आहे. हे बाटग्यांना कसे समजणार”? असे संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे म्हटले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणे | मंचरमध्ये भरदिवसा गोळ्या घालून सराईत गुन्हेगाराचा खून

Tokyo Olympic 2020 | भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्यफेरीत धडक