राज्यातील नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन न केल्यास लॉकडाउन सारखी परिस्थती उद्भवण्याची भीती पालकमंत्री अस्लम शेख यांनी वर्तवली होती. या त्यांच्या संकेतानंतर मनसे आक्रमक झाली असून त्यांना भेंडी बाजार, बेहराम पाड्यात चक्कर मारण्याचा सल्ला मनसेने दिला आहे.
संदीप देशपांडे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे, “मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी, मास्क लावला नाही तर लॉक डाउन करावा लागेल, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडी बाजार आणि बेहराम पाड्यात पण द्यावा किमान स्वतःच्या मतदार संघात एक चक्कर तरी मारावी” असे संदीप देशपांडे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
काय म्हणाले अस्लम शेख ?
“रुग्णसंख्या वाढत आहेत, हे मान्य करावं लागेल. आवाहन करूनही लोक ऐकत नाहीयेत. आता आम्ही कारवाईही सुरू केली आहे.पण, मुंबईकरांना परत लॉकडाउन बघायचा नसेल, तर त्यांनी स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे” असं सांगत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी परिस्थिती बिघडल्यास लॉकडाउन लागू करण्याचे संकेत दिले आहेत
Comments
Loading…