in

‘उत्तर भारत के लोगन से’ मनसेला हवी साथ! ठिकठिकाणी झळकले पोस्टर्स

मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या व उत्तर प्रदेश नागरिकांविरोधात आदोलन पुकारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना साद घालायला सुरुवात केली आहे. यासाठी भोजपुरी भाषेत बॅनर्स सध्या मुंबईत झळकतायत. तसेच हे बॅनर्स सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.

मनसे स्थापन झाल्यानंतर मराठी माणसांच्या हक्कासाठी उत्तर भारतीयांना चोप देऊन अनेक आंदोलन पुकारली होती. मात्र आता त्याच मनसेने रणनीती बदलत आता उत्तर भारतीयांना साद घालायला सुरुवात केली आहे. त्यासाठी मुंबईच्या कांदिवली परिसरात भोजपुरी भाषेत बॅनर्स लावण्यात आले आहे.

कांदिवली परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनर्सच्या माध्यमातून मनसेने उत्तर भारतीय मतदारांना पक्षात सामील होण्याचे आवाहन केले आहे. जय श्री राम … हिंदुत्व के सम्मान में “उत्तर भारतीय भी मनसे के साथ मैदान में, अशा ओळी या बॅनर्सवर पाहायला मिळत आहेत.

दरम्यान याआधी मनसेने आपल्या पक्षाचा झेंडा बदलून हिंदुत्त्वाचा राजकारणात सक्रीय पाऊल टाकले होते. यानंतर आता उत्तर भारतीय मतदारांना साद घालायला सुरुवात केली आहे. मनसेच्या भूमिकेत पाहायला मिळणारा हा बदल अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लस घेतली पण फोटो काढण्याची नौटंकी करत नाही – अजित पवार

Tata-Mistry Case |सायरस मिस्त्रींना न्यायालयाचा दणका