in ,

“हिंदुहृदयसम्राटांचे भाषण म्हणजे असायची पर्वणी आता मात्र सगळंच अळणी”

भाजप, शिवसेना, मनसे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, दसरा मेळावा, संदीप देशपांडे, राज ठाकरे, breaking news, headlines, raj thakre, sandip deshpande, shivsena, manse, uddhav thakre, bjp, ncp,

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली षण्मुखानंद सभागृहात पार पडला. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचे भाषण म्हणजे असायची पर्वणी आता मात्र सगळंच अळणी, गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून भाजप नेते प्रवीण दरेकर तसेच नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. तर पुढे ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री यांनी केलेल्या हिंदूत्व धोक्यात आहे ते परक्यांपासुन नाही तर ह्या नवहिंदूंपासुन या वक्तव्यावर देशपांडे यांनी पलटवार केला आहे ते म्हणाले की मला ते हिंदू , नवहिंदू कळत नाही पण ही नवीन शिवसेना आहे अस मला वाटतं आणि ही नवीन शिवसेना आहे त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन कॉंग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली आहे.’

बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांमध्ये एक उर्जा असायची आता काय सगळ अळणी झालेले आहे. मीठ नसलेल्या जेवणासारखे कालचे भाषण होते आणि त्यामुळेच अशा पद्धतीचा आता लोकांना ही कंटाळा वाटायला लागलेला आहे. यासर्व प्रकरणात आता शिवसेनेकडून नेमकं काय प्रत्युत्तर मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भूमी पेडणेकर होणार ‘पत्रकार’

नाशिकमध्ये एटीएमवर चोरट्यांचा डल्ला