in

MNS| मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आज गजानन काळे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई न्यायालयात सुनावणी पार पडली. जस्टिस एस. के. शिंदे यांच्यासमोर गजानन काळे यांची सुनावणी झाली. शिंदे यांनी दोन्ही बाजू ऐकून काळे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

गजानन काळे यांच्या पत्नीने विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक हिंसाचार आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. सध्या नेरूळ पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात कौटुबिंक हिंसाचार आणि अट्रॉसिटीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून गजानन काळे मारहाण करत होते अशी तक्रार त्यांच्या पत्नीने केली आहे. तसेच त्यांचे अनेक स्त्रियांशी विवाहबाह्य संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

पत्नीचे गंभीर आरोप-
गजानन काळे आणि संजीवनी काळे हे २००८ साली विवाहबद्ध झाले. गजानन काळे यांचे परस्त्रीयांसोबत अनैतिक संबंध असल्याचं अनेक वेळा माझ्या निदर्शनास आलं आहे. त्याला येणारे फोन कॉल, मेसेजवरुन ते लक्षात येतं. मी त्याला वारंवार समजून सांगायचे, पण माझ्या काही पत्रकार मैत्रिणी आहेत. तू याच्यात लक्ष घालू नको, असं म्हणून तो मला मारहाण करायचा, असंही गजानन काळे यांच्या पत्नीने पोलिस तक्रारीत म्हटलं आहे. 2008 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरच्या काहीच दिवसांत आमच्यात भांडण सुरु झालं. तेव्हापासून आमच्यात वारंवार खटके उडतात. असे आरोप गजानन काळे यांच्या पत्नीने केले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘न सांगता इतकी गर्दी जमली, सांगून बघू का’; संभाजीराजेंचा सरकारला इशारा

गुगलचं भन्नाट फीचर! आता विना इंटरनेट अ‍ॅक्सेस करता येणार सर्व फाईल्स