in

इंधन दरवाढी : ‘मनसे’ च्या निशाण्यावर भाजपा आणि शिवसेना

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात दररोज इंधन दरवाढीचे नवनवीन विक्रम होत आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष इंधन दरवाढीविरोधात मैदानात उतरली असून त्यांनी आपल्या मनसेने स्टाईलने आंदोलन करू असा इशारा केंद्र सरकारला दिला. याआधी काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात आवाज उठवला होता.

इंधन दरवाढ कमी करा हे आता हात जोडून सांगतोय. हात उगारायची वेळ आणू नका असा इशारा आज मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी हा इशारा देण्यात आला. डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

दरम्यान पेट्रोलच्या दरावाढीने शंभरी गाठली आहे. तर डिजेलच्या दरवाढीने ९० रुपयांचा आकडा गाठला आहे. घरगुती गॅसचे दरही वाढले आहेत. इंधऩाचे दर वाढले की, अन्य वस्तूंच्या मालवाहतूकीचा दर वाढतो. २०१४ साली केंद्र सरकारला पेट्रोल डिजेलच्या करापोटी ५३ हजार कोटी रुपये मिळत होते. सद्यस्थितीत केंद्र सरकालला १ लाख ८०० कोटीचा कर मिळत आहे. असे मनसेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अक्षय कुमारच्या चित्रपटाला नेटफ्लिक्सने नाकारलं

पुण्यातील ‘शक्ती’ आत्महत्येप्रकरण त्या ऑडिओ क्लिप्सची चौकशी करा