in

मोदी सरकारचं गिफ्ट; सरकारी कर्मचाऱ्यांना ‘चार दिवस कामाचे…’

लोकशाही न्यूज नेटवर्क

मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. 1 एप्रिलपासून आठवड्यातून फक्त चार दिवस काम असे मोदी सरकारने सांगितले आहे. नव्या कामगार कायद्यानुसार येणाऱ्या कालावधीत कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ३ दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ४ दिवस काम आणि उर्वरित ३ दिवस सुट्टीचा पर्याय मिळणार आहे. त्याशिवाय मंत्रालयाकडून असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी एक इंटरनेट पोर्टल तयार करण्यात येणार आहे. जून महिन्यापर्यंत हा पोर्टल तयार होणार असून यावर अंसघटित कामगारांची नोंदणी आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या सुविधांची माहिती दिली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशा वेब पोर्टलबाबत भाषणात उल्लेख केला होता.


केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढणार आहे. याचा फायदा ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६१ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना १७ टक्के महागाई भत्ता मिळत असून, त्यात ४ टक्क्यांनी वाढ होऊन त्यांना २१ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे.
नव्या कायद्यानुसार सरकारने ४ दिवसात कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना १२ तास काम करावे लागेल. आठवड्यात काम करण्याची मर्यादा ४८ तासांची आहे. त्यामुळे १२ तास काम केल्यास ४ दिवस काम करून ३ दिवस सुट्टी देता येऊ शकते.

१ एप्रिल २०२१ पासून नवीन ४ कामगार कायदे लागू होणार आहेत. कामगार कायद्याच्या नियमांना अंतिम रूप दिलं जातं आहे, येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याबाबत सर्वांशी चर्चा करण्यात आली आहे. लवकरात लवकर कामगार कायदे लागू करण्यात येतील असे कामगार सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सिंधुदुर्गातले भाजपाचे सात नगरसेवक आज हाती शिवबंधन बांधणार

नांदेडमधून खलिस्तान समर्थक दहशतवादी अटकेत