in

टि्वटरवर ट्रेण्ड होतंय ‘मोदी जॉब दो’

सोशल मीडिया हा अभिव्यक्तीचा उत्तम नमुना आहे. अनेकजण आपली मतं अगदी बिनदिक्कतपणे समाज माध्यमांवर व्यक्त करत असतात. असाच एक हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. #modi_job_do हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे.

अनेक व्यक्तींनी #modi_job_do असा हॅशटॅग वापरून मोदी सरकारला सवाल केले आहेत. दरवर्षी २ कोटी तरुणांना रोजगार देऊ म्हणणाऱ्या मोदी सरकारनं दरवर्षी २ कोटी रोजगार हिरावून घेतले आहेत, अशी टीका ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी केली आहे. तसंच सार्वजनिक मालमत्ता भांडवलदारांच्या खिशात घालण्याचं काम मोदी सरकार करत असल्याचा आरोपही वकील भूषण यांनी केला आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी #modi_job_do असा हॅशटॅग वापरून मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. आम्हाला नोकरी द्या, अशी मागणी तरुण नेटकरी करत आहेत. काही दिवसांपूर्वी #modi_rojgar_do असा हॅशटॅग टि्वटरवर ट्रेण्ड झाला होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोदी सरकारवर टीका केली जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत पेट्रोलची वाटचाल शतकाकडे; वाचा आजचे दर

पेट्रोल-डिझेलच्या किंमती निम्म्यापर्यंत येणार? पेट्रोलियम मंत्र्यांचे संकेत