लोकशाही न्यूज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना कृषी कायदा , शेतकरी आंदोलन आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या वेळी त्यांनी काँग्रेस पक्षासह विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेते शरद पवार यांच्यावरही कृषी कायद्याबाबतच्या भूमिकेवरून टीका केली आहे.
शरद पवार यांनी एकदा बाजार समित्यांमधील सुधारणांविषयी विचारण्यात आले होते. तेव्हा शरद पवार यांनी म्हटले होते की, शेतकऱ्यांच्या बचावासाठी एपीएमसीच्या बदलांना प्रमोट करण्यात येत आहे. कारण शेतकऱ्यांना एपीएमसी मंडयांचा पर्याय मिळेल, जेव्हा जास्त व्यापारी रजिस्टर होतील, तेव्हा स्पर्धा वाढेल आणि मंडईतील साटंलोटं बंद होईल, असं पवार म्हणाले होते.
त्यामुळे आपल्याला या बाबी समजून घ्याव्या लागतील. जिथे विरोधकांचं सरकार आहे, तिथे कृषी कायद्यांतील सुधारणांची अगोदरच अंमलबजावणी झाली आहे. आम्हाला प्रतिगामी नव्हे तर पुरोगामी राजकारण करायचे आहे, असे मोदींनी म्हटले. यावेळी त्यांनी एका भोजपुरी वाक्यप्रचाराचा दाखला देत विरोधकांना टोलाही हाणला. विरोधकांचे कृषी कायद्यांबाबतचे वर्तन म्हणजे, ‘ना खेळणार, ना खेळू देणार, मी खेळ बिघडवणार’, अशाप्रकारचे असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
Comments
Loading…