in ,

मनी लाँड्रिंग प्रकरणी रमेश चंद्र, प्रीती चंद्रा यांना अटक

युनिटेकचे संस्थापक रमेश चंद्र, त्यांची सून प्रीती चंद्रा आणि रिअल इस्टेट प्रवर्तक राजेश मलिक यांना ईडीने सोमवारी मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली. संजय चंद्रा, प्रीती यांचे पती, रमेश चंद्रा यांचा मुलगा, स्वतः मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत.

सोमवारी एजन्सी मुख्यालयात चौकशी केल्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाईल आणि ईडीकडून त्यांच्या कस्टोडीअल रिमांडची मागणी केली जाईल. पीएमएलए (PMLA) म्हणजेच मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत ही अटक केली आहे.

शनिवारी ईडीने या प्रकरणात केलेल्या तपासणीत 13,600 चौरस मीटरची, 30.29 कोटी रूपये किंमत असलेली जमीन अटॅच केली आहेत.

रमेश चंद्रा आणि त्यांच्या मुलांवर कॅनरा बँकेची 198 कोटींची फसवणूक केल्याचा सुद्धा आरोप आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

BIGG BOSS 3: हे कपल पुन्हा एकत्र येतील अशा चर्चा

अंमली पदार्थाच्या विक्रीविरोधात भाजप आमदारांचा मोर्चा