in

Monsoon | येत्या तीन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना लवकरचं दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण येत्या पाच दिवसांत राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्यास सुरु झाली आहे.

त्यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या ५ दिवसांत मान्सूनचे दमदार आगमन होणार असून नागरिकांना विजांच्या गडगडाटासह हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पाऊसाचा सरी अनुभवता येणार आहे. वादळी वाऱ्यासह बरसणारा हा पाऊस राज्यात पुढील ४ दिवस म्हणजेच ३१ मेपासून ते ३ जूनपर्यंत सक्रिय राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान मान्सूनच्या ताज्या अपडेटची माहिती देण्यासाठी तुम्ही दामिनी अ‍ॅपचा वापर करु शकता असे हवामान तज्ज्ञ के.स. होसाळीकर यांनी सांगितले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Metro | आकुर्ली मेट्रो स्टेशनबाहेर भाजपचं काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन

शेतकरी बांधवांना खरिपासाठी कर्ज पुरवठा करणार