in

Weather Alert | उद्या ‘मान्सून’ भारतीय किनाऱ्यावर धडकणार!

भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर उद्या मान्सून धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, केरळ किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागावर उद्या पावसाळा सुरू होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने येत असलेल्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागात आठवडाभर हलक्या स्वरूपाच्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातून सध्या वेगाने प्रगती करीत असलेले नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्यास सध्या अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाकडून या अगोदर स्पष्ट करण्यात आले होते. तसेच, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात १ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

५६ वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉनसन अडकले लग्नबंधनात

मंत्रालयात बॉम्ब ?