in

पुण्यात आणखीन कडक निर्बंध; अजित पवारांनी दिल्या प्रशासनाला सुचना

पुण्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आणखीन कडक निर्बंध लादण्याच्या सूचना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर पूरवठ्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

पुण्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. त्यामुळे आणखीन कडक निर्बंध लादण्याच्या सूचना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.निर्बंधाची कडक अंमलबजावली केल्यास रुग्णसंख्या नियंत्रणात येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच विविध रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरु करण्याबाबत चर्चा झाली. 45 वर्षावरील अनेकांना दुसरा डोस मिळत नसल्याचे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आणि 18 ते 44 वयोगटातील लसीकरणास अडथळा येत आहे. त्यामुळे लसीच्या पुरवठा सुरळीत करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र पूनावाला 10 ते 12 दिवस भारतात परतणार नाही आहेत असे पवार म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Rajesh Tope | केंद्रानं ऑक्सिजनची गरज भागवावी; राजेश टोपेंची मागणी

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध- अजित पवार