in

११ लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त

मालेगावच्या विशेष पोलिस पथकाची कारवाई, दोन दिवसांपूर्वीच २८ किलो गांजा केला होता जप्त

संदीप जेजूरकर, नाशिक
अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कंबर कसली असून नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील सायने शिवारात तब्बल १३७ किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मालेगावच्या सायने शिवारात अमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचे समजल्यावर पोलिसांनी सापळा रचत एका कारमधून सहा गोणीत आणलेला १३७ किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला. या कारवाईत ११ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघा संशयितांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे तर एक संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच २८ किलो गांजा मालेगावात जप्त करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सैराटनंतर नागराज मंजुळे, आकाश ठोसर येणार एकत्र

जिममध्ये ह्रतिक रोशन खेळू लागला गरबा; व्हिडीओ झाला व्हायरल