in

वर्ध्यात 60 पेक्षा अधिक दुकाने सील

वर्ध्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनचे निर्बंध लावण्यात आले आहेत.मात्र हे नियम व्यावसायिकांकडून धाब्यावर बसवले जात होते. त्यामुळे आज प्रशासनाने दुकाने उघडी ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे दुकाने सील करण्याची कारवाई केली.

वर्ध्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.त्यात नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत होते. त्यामुळे या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तर शहरातील व्यापारी वर्गाकडून कोविड नियमांची पायमल्ली सुरु होती. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत,शहराच्या मुख्य बाजार परिसरातील दुकाने सील करत कारवाई केली. आजच्या कारवाईत नगरपालिका व महसूल विभागाने 60 हुन अधिक दुकाने सील केली आहे.

वर्ध्यात जीवनावश्यक वस्तूची दुकाने उघडी ठेवण्यात आली होती. यावेळी या दुकानात मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत होती तर काही व्यापाऱ्यांनी आपला व्यापार दुकाने मागच्या दारातून सुरू ठेवला होता. तर काही दुकानात सोशल डिस्टनसिंग व दुकानापुढे सॅनिटायझर ठेवलेले नाही. तर दुकानापुढे सामाजिक अंतराचे वर्तुळ आखले नसल्यामुळे दुकाने सील करण्यात आले असल्याचे माहिती मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांनी सांगितले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPLला स्थगिती; हंगाम पूर्ण करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार

रेमडेसिव्हीर, ऑक्सिजनच ग्लोबल टेंडर काढणार- राजेश टोपे