in

धक्कादायक !आईनेच पोटच्या मुलांना दगड खानीत फेकले

रुपेश‌ होले : बारामती तालुक्यातील पिंपळी गावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवरा बायकोच्या भांडणात आईनेच मुलांना दगडी खानीत फेकून दिल्याची घटना घडली. आज पहाटे घडलेल्या या दुर्दैवी घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बारामती तालुक्यातील पिंपळी गावात राहणाऱ्या पत्नी अंजली आणि अतुल यांचं कडाक्याचे भांडण झालं होतं. याच रागाच्या भरात पत्नीने आज पहाटे आपल्या पोटच्या दोन मुलांना पिंपळी येथील दगड खानीत फेकून दिलं आणि स्वतः उडी घेतली. पतीने पत्नीला बाहेर काढलं परंतु या दगड खानीत बुडून दोन बालकांचा मात्र बुडून मृत्यू झाला आहे. चार वर्षांच्या दिव्या आणि दोन वर्षांच्या शौर्यचा यात बुडुन मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेचा तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट लस

‘भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहा’