in

Motorola चा Moto E7 Power स्मार्टफोन लॉन्च

Motorola ने भारतीय बाजारात स्वस्त आणि जबरदस्त लेटेस्ट स्मार्टफोन Moto E7 Power लॉन्च केला. Moto E7 Power हा कंपनीचा E7 सीरिजमधील तिसरा फोन आहे. यापूर्वी कंपनीने Moto E7 आणि E7 Plus आणले होते.

Moto E7 Power चे फिचर्स
Moto E7 Power अँड्राइड 10 ओएसवर सिस्टीमवर चालणार आहे. हा मोबाईल मीडियाटेक हिलियो जी 25 प्रोसेसरवर काम करतो. मोबाईलला 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यात माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील आहे.

फोनमध्ये 13MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP क्षमतेचा कॅमेरा आहे. याशिवाय पोट्रेट मोड, पॅनोरामा, फेस ब्युटी, मॅक्रो व्हिजन, मॅन्युअल मोड आणि एचडीआर मोड यांसारखे अनेक प्री-लोडेड कॅमेरा फिचर्सही आहेत. तसेच पॉवर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरीही आहे.

Moto E7 Power च्या 2GB + 32GB स्टोरेज असून या मोबाईलची किंमत 7 हजार 499 रुपये आहे. तर, 4GB + 64GB च्या फोन किंमत 8 हजार 299 रुपये आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Assembly Budget | बोलू देत नसल्याने विरोधकांचा सभात्याग

Maharashtra assembly budget session | अधिवेशन सुरू होताच काही तासांतच भाजपाचे सभात्याग