राज्यातील बड्या नेत्यांमध्ये आता कोरोनाचा संसर्ग होत असताना औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनाही कोरोनाची लागण झाली. इम्तियाज जलील यांनी ट्विटवरुन ही माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज जलील यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे जलील यांनी कोरोना चाचणी करवून घेतली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता इम्तियाज जलील यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे सरकारमधील अनेक बड्या नेत्यांना कोरोनची लागण झाली आहे. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बच्चू कडू, एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे यांचा समावेश आहे.
Comments
Loading…